Post 1 Day national seminar news held @ KIAS

कृष्णा विश्व विद्यापीठामध्ये भारतीय प्राचीन ज्ञान व संशोधन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

कराड: दिनांक 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद जयंती चा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्त्य साधून कृष्णा विश्व विद्यापीठा अंतर्गत असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्सेस व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्राचीन ज्ञान माहिती व संशोधन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी कृष्णा विश्व विद्यापीठामध्ये (अभिमत विद्यापीठ)आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलपति आदरणीय डॉ. सुरेशजी (बाबा)भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनास विद्यापीठाचे प्र. कुलपति माननीय डॉ. प्रवीण शिंगारे ऑनलाईन प्रणाली द्वारे, कुलगुरू माननीय डॉ. नीलमजी मिश्रा, कुलपतिंचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाशजी मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे तसेच परिसंवादातील वक्ते श्री. सतीश कुलकर्णी (ASTRA, India) पुणे,डॉ. प्रशांत होले (लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी , नागपूर ), डॉ. बी. एन. जगताप (आय.आय.टी. सेवानिवृत्त प्राध्यापक मुंबई) तसेच डॉ. जी. आर. पठाडे अधिष्ठाता (KIAS), कृष्णा विश्व विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सर्व संस्थांचे अधिष्ठाता व इत्यादि मान्यवर उपस्थित होते. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरु माननीय डॉ. नीलमजी मिश्रा यांनी उदघाट्न सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानाने झाली. प्रथम सत्रामध्ये कुलपतिंचे प्रमुख सल्लागार आदरणीय डॉ. वेदप्रकाशजी मिश्रा यांचे वैदिक ज्ञानावरचे मौलिक मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. भारतीय ज्ञान प्रणाली वेद उपनिषदे त्या काळातील समाज रचना आणि आजच्या काळात त्याची असलेली उपयुक्तता याविषयी मौलिक माहिती आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांनी प्रदान केली. डॉ. ए. एम. देशमुख अध्यक्ष मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी यांनी भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये वर्णन केलेल्या सूक्ष्मजीवशास्त्र व त्याचे आधुनिक जीवनशैलीशी असणारे सहसंबंध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.

दुपारच्या सत्रात श्री. सतीश कुलकर्णी यांनी भारतीय प्राचीन विज्ञान परंपरा व त्यामागील सैद्धांतिक दृष्टिकोन विद्यार्थी व उपस्थितांना समजावून सांगितला. डॉ. प्रशांत होले सर यांनी एक सादरीकरण केले व त्याद्वारे विविध प्राचीन संस्कृती व विद्या याचा सध्या असणाऱ्या ज्ञान प्रणालीशी जोडून शास्त्रीय महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. डॉ. बी. एन. जगताप यांनी त्यांच्या सत्रामध्ये विविध अध्यापन व अध्ययन पद्धती याविषयी विस्तृत माहिती व त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन प्राचीन शिक्षण प्रणाली जोडून त्याचे आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये महत्त्व सांगितले. त्याचबरोबर जर्मन वैज्ञानिक डॉ. उलरीच बर्क यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अग्निहोत्र व त्याचे विविध स्तरांवर असणारे महत्त्व उदाहरणार्थ, पर्यावरण, शेती, सूक्ष्मजंतू,पाणी शुद्धीकरण यावरून होणारा सकारात्मक परिणाम याविषयक स्वतःचे संशोधन विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या समारोप सत्राचे अध्यक्षपदी डॉ. डी. के. अग्रवाल संचालक, संशोधन विभाग कृष्णा विश्व विद्यापीठ हे उपस्थित होते ह्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्सेस च्या विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. सुमारे १०७ विद्यार्थ्यांनी आयुर्वेद योग मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भारतीय प्राचीन ज्ञान व विद्या याचे सादरीकरण केले होते.या स्पर्धेतील पारितोषिके व विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. डी. के. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमास संपूर्ण भारतातून 400 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक, संशोधक विद्यार्थी हे प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रणाली द्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सौ. स्नेहल मसुरकर सहयोगी प्राध्यापिका, सौ. अश्विनी जाधव सहाय्यक प्राध्यापिका (KIAS) यांनी केले. या परिसंवादासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
सौ. शिल्पा रुईकर सहाय्यक प्राध्यापिका व सौ. प्राजक्ता सरकाळे, सहाय्यक प्राध्यापिका यांनी आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

DSC_2015-3000x2000-600x400 -20

TOP